यिर्मया 29:11: “परमेश्वर म्हणतो, तुमच्याविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो; ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत; ते तुम्हांला तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत.” तुमच्या जीवनासाठी योजना आहे ही दिलासा देणारी गोष्ट नाही का? प्रवासात जे काही घडले असेल, तुम्ही चुकीची पावले उचलली असतील किंवा चुकीची वळणे घेतली असतील, तरी आता ह्या क्षणी देव तुम्हांला मार्गदर्शन करत आहे. स्पष्टच सांगायचे, तर तो तुम्हांला खुद्द त्याच्याकडेच नेत आहे. तुमची अंतिम आशा आणि तुमचे भवितव्य ह्या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्येच आहेत ही वास्तविकता आहे. ह्याचा साधासरळ अर्थ म्हणजे, तुमचे संपूर्ण जीवन तुम्ही येशूसाठी जगू शकता. आणि त्याच्यामुळ आणि त्याने दिलेल्या अभिवचनामुळे तो तुम्हांला कधीच सोडणार नाही किंवा टाकणार नाही. तुम्हांला उत्साही, आवेशी करणारे असे काहीतरी आता तुम्हांला मिळाले आहे. हा एक प्रवास: जीवभराची प्रक्रिया आहे तुम्हांला प्रश्न पडला असेल की, ख्रिस्ताचा स्वीकार केल्यावर आता मी काय केले पाहिजे? तुम्ही पहिले पाऊल उचलल्यानंतर पडणारा हा मोठा प्रश्न आहे. आज कदाचित तुम्हांला वेगळे असे काही वाटणार नाही, ख्रिस्ताने तुमच्या अंतरंगात कार्य करण्याची सुरुवात केली आहे हे लक्षात ठेवा.
कलस्सै.2:6-7 म्हणते, तर ख्रिस्त येशू जो प्रभू, ह्याला जसे तुम्ही स्वीकारले तसे त्याच्यामध्ये चालत राहा; त्याच्यामध्ये मुळावलेले, रचले जात असलेले, तुम्हांला शिकवल्याप्रमाणे विश्वासात दृढ होत असलेले, आणि निरंतर उपकारस्तुती करणारे व्हा. प्रार्थना करणे, देवाच्या वचनाचे म्हणजे पवित्र शास्त्राचे वाचन करणे, आणि पवित्र आत्म्याने तुम्हांला मार्गदर्शन करावे म्हणून त्याला अनुमती देणे ह्यांद्वारे तुम्ही मुळावले जाता. ख्रिस्तासोबत तुमच्या जीवनाची सुरुवात करणे देवाच्या वचनाचे अभिवचन आणि येशूने त्याच्या शिष्यांना उद्देशून उच्चारलेले शब्द असे आहेत : चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करायला येतो; मी तर त्यांना जीवनप्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. – योहान.10:10 ख्रिस्तामध्ये पूर्ण आणि उत्कंठापूर्ण जीवन जगण्यासाठी तुम्हांला पाचारण करण्यात आले आहे. दृढपणे ह्या प्रवासाची सुरुवात करा.