येशूला कसे ओळखावे हे तुम्ही शिकता तेव्हा तुमच्या जीवनासाठी असलेल्या देवाच्या योजनेच्या अद्भुत प्रवासाला तुम्ही सुरुवात करता. रोम.३:२३ असे म्हणते कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. येशूला ओळखणे ह्याचा साधासोपा अर्थ म्हणजे तुम्हांला त्याची गरज आहे हे मान्य करणे, त्याने तुमच्यासाठी जे काही केले त्यावर विश्वास ठेवणे आणि त्याच्या अद्भुत देणगीचा स्वीकार करणे. तुम्ही स्वतःच्या शक्तीने हे जीवन जगू शकत नाही, तुम्ही पाप केले आहे आणि तुम्हांला तारणाऱ्याची गरज आहे हे मान्य करणे. आणि त्या क्षणी घडणारा सुंदर बदल ही येशूला ओळखण्यासंबंधीची आणि तारले जाण्याविषयीची चांगली बातमी आहे. तुम्ही केलेल्या सर्व पापी आणि वाईट गोष्टी त्याला देता आणि त्या बदल्यात देव त्याने जे काही तुमच्यासाठी केले आहे ते तुम्हांला देतो. तुम्हांला माहीत असो अथवा नसो, पण तुमच्या जीवनासाठी असलेली त्याची योजना सुंदर आहे, आणि ह्या प्रवासाचे हे पहिले पाऊल किंवा पहिली पायरी आहे.
“देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” – योहान 3:16